वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079441 · अभंग क्र. ३८३२

3832.
(बाळक्रीडा अभंग)
केला पुढे हरी अस्तमाना दिसे । मागे त्यासरिसे थाट चाले ॥१॥
थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढे कृष्ण राम तया सोयी ॥२॥
सोयी लागलिया देवाची आवर्ती । बोलविता येती मागे तया ॥३॥
तयांचिये चित्ती बैसला अनंत । घेती नित्यनित्य तेचि सुख ॥४॥
सुख नाही कोणा हरीच्या वियोगे । तुका म्हणे जुगे घडी जाय ॥५॥

अर्थ :
एकदा सुर्‍यास्त झाला की सर्व गाई गोपाल कृष्ण मागे घराकडे फिरे पुढे कृष्ण पाठीमागे गाई गोपाल असा थाट चालत असताना दिसे. असा थाटात चालत असताना पुढे कृष्ण व बलराम आणि पाठीमागे गाई गोपालांचा समुदाय चालत असे. ज्यांना देवाची सवय लागलेली आहे त्यांना देवाने बोलावले नाही तरी ते देवाच्या मागे मागेच येत असतात. त्या गोपाळांच्या चित्तामध्ये एक हरीच बसलेला असतो. ते नेहमी नेहमी हरीचे सुखच घेत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना कोणालाही हरीच्या वियोगाने वेळ जात नाही सुखच मिळत नाही हरी वाचुन प्रत्येक क्षण त्यांना युगाप्रमाणे जातो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग