वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(गौळणींची अवस्था)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079816 · अभंग क्र. ३७९९

3799.
(गौळणींची अवस्था)
पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥१॥
बैसला तो माझे मनी । नका कोणी लाजवू ॥धृपद॥
जीवी आवडे जीवाहूनि । नव्हे क्षण वेगळा ॥२॥
झाले विश्वंभरा ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥३॥

अर्थ :
देवाचे रुप आकाशात देखील अगदी शोभून दिसत आहे. असा माझा कृष्ण देव माझ्या मनात बसला आहे त्यामुळे मला कोणीही लाजवू नका. तो कृष्ण माझ्या जीवाहूनही अधिक मला आवडतो आहे आणि माझ्यापासून एक क्षणभर देखील वेगळा राहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझा स्वामी विश्वंभराची दासी असलेली ती गवळण माझ्या स्वामी सारखीच झाली.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग