वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079381 · अभंग क्र. ३८४०

3840.
(बाळक्रीडा अभंग)
खेळींमेळी आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशी ॥१॥
मातेपाशी एक नवल सांगती । झाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥
ओवाळिले तिने करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥३॥
पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥४॥
कवतुका कानी आइकता त्यांचे । बोलता ये वाचे वीट नये ॥५॥
नयन गुंतले श्रीमुख पाहता । न साहे लवता आड पाते ॥६॥
तेव्हा कवतुक कळो आले काही । हळुहळु दोही मायबापा ॥७॥
हळुहळु त्यांचे पुण्य झाले वाड । वारले हे जाड तिमिराचे ॥८॥
तिमिर हे तेथे राहो शके कैसे । जालिया प्रकाशे गोविंदाच्या ॥९॥
दावी तुका म्हणे देव ज्या आपणा । पालटे तो क्षणामाजी एका ॥१०॥

अर्थ :
सर्व गोपाळांसोबत गोपीनाथ खेळीमेळीने घरी आले व मातेपाशी जाऊन बसले. मग सर्व गोपाळानी यशोदा मातेजवळ घडलेले नवल सांगितले व कृष्णाने कसा वनवा गिळून टाकला याची ख्याती यशोदा मातेजवळ सर्व गोपाळांनी जाऊन सांगितली. यशोदेने कृष्णाची आरती काढून दृष्ट कृष्णाची काढली व पुढे काय काय घडले ते सर्व गोपाळांना विचारले. यशोदेने घडलेला प्रकार पुन्हा पुन्हा गोपाळांना विचारला व गोपाळानेही कौतुकाने पुन्हा पुन्हा तेच सांगितले. यशोदेला कृष्णाचे कौतुक ऐकताना आणि गोपाळांना कृष्णाचे कौतुक सांगताना वाचेला वीटच येत नव्हता. कृष्णाचा एवढा मोठा पराक्रम ऐकून यशोदा कृष्णाकडे एकसारखे पाहू लागली आणि पाहाताना डोळयाचे पाते जरी आडवे तरी तिला सहन होत नव्हते. तेव्हा कोठे यशोदा आणि नंदाला कृष्णाचे कौतुक हळूहळू कळू लागले होते. हळूहळू त्यांचे पुण्य वाढत गेले आणि गडद अज्ञानरुपी अंध:कारा

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग