(बाळक्रीडा अभंग)
3846.
(बाळक्रीडा अभंग)
पाषाण फुटती ते दुःख देखोनि । करिता गौळणी शोक लोका ॥१॥
काय ऐसे पाप होते आम्हापासी । बोलती एकासी एक एका ॥२॥
एकाचिये डोळा असु बाह्यात्कारी । नाही ती अंतरी जळतील ॥३॥
जळतील एके अंतर्बाह्यात्कारे । टाकिली लेकुरे कडियेहूनि ॥४॥
निवांत चि एके राहिली निश्चिंत । बाहेरी ना आत जीव त्यांचे ॥५॥
त्यांचे जीव वरी आले त्या सकळा । एका त्या गोपाळांवाचूनिया ॥६॥
वांचणे ते आता खोटे संवसारी । नव्हे भेटी जरी हरीसवे ॥७॥
सवे घेऊनिया चालली गोपाळा । अवघी च बाळा नर नारी ॥८॥
नर नारी नाही मनुष्याचे नावे । गोकुळ हे गांव सांडियेले ॥९॥
सांडियेली अन्ने संपदा सकळ । चित्ती तो गोपाळ धरुनि जाती ॥१०॥
तिरी माना घालूनिया उभ्या गाई । तटस्थ या डोही यमुनेच्या ॥११॥
यमुनेच्या तिरी झाडे वृक्ष वल्ली । दुःखे कोमाइली कृष्णाचिया ॥१२॥
यांचे त्यांचे दुःख एक जाले तिरी । मग शोक करी मायबाप ॥१३॥
मायबाप तुका म्हणे सहोदर । तोवरी च तीर न पवता ॥१४॥
अर्थ :
कृष्ण यमुनेच्या डोहात पडला हे समजल्यानंतर सर्व लोक व गवळणी शोक करु लागले ते पाहून दगड सुध्दा फुट पहात होते. सर्व एकमेकांना म्हणू लागले असे कोणते पाप आमच्याजवळ होते की, त्यामुळे हरी आमच्यापासून आज दूर झाला. काही गोकुळातील लोक असे होते की, त्यांनी केवळ दाखवण्यासाठी बाह्य रुपाने वरवर अश्रु आणण्याचा प्रयत्न केला परंतु काही लोक असेही होते की, या दु:खाने त्यांचे अंत:करण अगदी जळून गेले होते. कृष्णाचे अघटित दु:ख काही गवळणींना इतके जाळीत होते की, त्यांचे अंत:करण तर जळून गेले परंतु बाह्य रंगान
