वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 221. आडबंग ३८३३

आडबंग ३८३३

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084534 · अभंग क्र. ३८३३

3833.
आडबंग ३८३३

आडबंग आडबंग । सदा विषयामध्येदंग । मदमस्त डोले भुजंग । प्रेमकीर्तनाचा रंग । मोडूनि झाला नि:संग ॥१॥ बैसे वेश्याघरीं । जाऊन । तिशी करी हास्यवदन । स्वकरे विड्यादेऊन । वेश्या करी त्याचे छळण गा ॥२॥ ज्ञाननाहीं मूढ तो जन । स्वस्त्री टाकुन । उकिरडाओतीरे रतिरेत जन । आपुली स्त्री नेली मांगान गा ॥३॥ त्याचे न पहावे काळे वदन । पशु गाढवा समान । नरतनु व्यर्थ बुडवुन । नाही साधिले साधनगा ॥४॥ मागे केले देई टाकुन । करी हरिचे चिंतन । येणे साधले बहु साधन । के ला जामीनजनार्दन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग