वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 207. पाळणा ३८०४ ते ३८०७

पाळणा ३८०४ ते ३८०७

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085226 · अभंग क्र. ३८०४

3804.
पाळणा ३८०४ ते ३८०७

जो जो जो जो जो बाळा केवि येवो । उन्मनी निद्रा लागो तुज गीती गावो ॥१॥ जागजागतां निज पाहीमाझिया तान्हुलीयां । निजी निजनिजुनियां सावधरे कान्हया ॥२॥ तुम्हा चवघींचीकळवळ झणी येथ का करा । निजी निजला कान्हापरतोनी जावे घरा ॥३॥ चवघी जणी वोसरल्यातेथें अनुहत गोष्टी । तया नादातें साधुन परेपरत्यासृष्टी ॥४॥ तेथे उन्मनी निद्रा हारपलें चित्त । देहविदेह खुंटले सगुण गुणातीत ॥५॥ शब्द निशब्दखुंटले आता बोलावें ते काय । निजी निजला एकाजनार्दन माय ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग