द्रौपदीचा धांवा ३८३२
3832.
द्रौपदीचा धांवा ३८३२
कृष्णा धांव रे लवकरी । संकट । पडले भारी । हरि तू आमुचा कैवारी । आले विघ्ननिवारी ॥१॥ पांडव असता वनवासी । कळलेंकौरवांसी । त्याने पाठविले ऋषींसी । सत्त्वहरावयासी ॥२॥ साठि सहस्त्र खंड्या अन्न । दुर्वासाभोजन । सत्व जातील घेऊन । अंतर पडतांजाण ॥३॥ रात्र जाहली दोन प्रहर । आलेऋषेश्वर । भोजन मागती सत्वर । कैसा करूंविचार ॥४॥ आज का निष्ठुर जाहलासी । होईल बा गति कैसी । अनाथ मी देवा परदेशी । धांव तू वेगेंसी ॥५॥ आता न लावी उशीर॥अनर्थ करील हा फार । एवढा करी उपकार । देदर्शन सत्वर ॥६॥ कंठ शोषला अनंता । प्राणजाईल आता । पदर पसरते अच्युता । पावेरुक्मिणीकांता ॥७॥ ऐकुनि बहिणीची करुणा । आला यादवराणा । द्रौपदी लोळत हरिचरणा । एका जनार्दना ॥८॥
