वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

करूनी आइती सत्यभामा

🙏 3. संत तुकाराम · ABH-079620 · अभंग क्र. ३८०१

3801.
करूनी आइती सत्यभामा मंदिरी । वाट पाहे टळोनि गेली रात्री ।
नये देव येतील काम लहरी । पडिली दुश्चिती तव तो कवाड टिमकारी वो ॥१॥
सर परता तुझा कळला भाव । कार्‍या पुरते हे दाविसी लाघव ।
बोल बोलतोसी ते अवघी तुझी माव । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥धृपद॥
मीच वेडी तुजला बोल नाही । दानावेळे विटंबणा झाली काय ।
मागुती रुद्रासि भेटी दिली तई । विश्वास तो तुझ्या बोला आझुनि तरी नाही रे ॥२॥
भ्रम होता तो अवघा कळो आला । मानवत होते मी भला भला ।
नष्टा क्रिया नाही मा तुझीया बोला । तुकयाबंधु स्वामी कानडया कौसल्या रे ॥३॥

अर्थ :
श्रीकृष्ण महाला मंदिरात येणार आहे सत्यभामेला समजल्यावर सत्यभामेने श्रीकृष्णाच्या स्वागताची सर्व तयारी करून ठेवली श्रीकृष्णाची वाट पाहत होती परंतु रात्र टाळून गेली, तरीही श्रीकृष्ण अजून काही येईना कृष्णा अजूनही येत नाही हे पाहून सत्यभामा दुश्चित मनाने पडून होती कामवासनेच्या लहरी तिच्या अंतकरणात उमटत होत्या तोच कृष्णाने दरवाजाला हीत दिल्याचा आवाजाट आला. त्यावेळी कृष्ण महाल मंदिरात आला व सत्यभामे जवळ गेला त्यावेळी सत्यभामा देवाला म्हणाली आता तुमच्या अंतःकरणातील सत्य भाव आम्हाला समजला आहे तुम्ही केवळ तुमचे कार्य पूर्ण होईपर्यंत आमच्याशी गोड बोलत असतात देवा. तुम्ही जाणून-बुजून सूर्य उदयाच्या वेळी आत मध्ये आला आहात या अर्थी तुमच्यावर बोल नाही तुमचे सर्व बोलणे म्हणजे मायिक आहे. देवा मीच वेडी आहे ज्यावेळी नारदाने तुमचे दान मला मागितली त्यावेळी मी तुमचे दान दिले आणि नंतर मारुतीला ज्यावेळी तुम्ही भेट दिली त्यावेळी माझी किती विटंबना झाली हे

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग