वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079754 · अभंग क्र. ३८२१

3821.
(बाळक्रीडा अभंग)
ओळखी तयाची होय एका भावे । दुसरिया देवे न पविजे ॥१॥
न पविजे कदा उन्मत्त झालिया । दंभ तोचि वाया नागवण ॥२॥
वनवास देवाकारणे एकांत । करावी ही व्रततपे याग ॥३॥
व्रत याग यांसी फळली बहुते । होती या संचिते गौळियांची ॥४॥
यांसी देवे तारियेले न कळता । मागील अनंता ठावे होते ॥५॥
होते ते द्यावया आला नारायण । मायबापा ऋण गौळियांचे ॥६॥
गौळियांचे सुख दुर्लभ आणिका । नाही ब्रम्हादिका तुका म्हणे ॥७॥

अर्थ :
देवाची ओळख एका भक्तिभावाने होते दुस-या कोणत्याही साधनेने देव प्राप्त होत नाही. उन्मत्त होऊन दंभाने वागले तर केवळ व्यर्थ फजिती होईल देव कधीही प्राप्त होणार नाही. देवाकरीता एकांत, वनवास, व्रत, तपे, याग करावेत. गवळयांनी पूर्वी केलेले व्रत, याग फळाला आले त्यांचे पूर्वसंचित खूप चांगले होते त्यामुळे तर त्यांचे व्रत, याग फळाला आले आहेत, फलद्रुप झाले आहेत. गवळयांना त्यांचे पूर्व पुण्याई चांगले होते या गोष्टी माहितच नव्हत्या परंतु देवाला त्या माहिती होत्या त्यामुळे तर देवाने त्यांना भवसागरातून तारले आहे होते. अहो या गवळयांचे मायबाप नंद यशोदेचे पूर्वी देवाकडे या नारायणाकडे सेवारुपी ऋण होते तेच देण्याकरता तेच फेडण्यासाठी देवाने गोकुळात अवतार घेतला. तुकाराम महाराज म्हणतात, गवळयांना देवाकडून मिळालेले सुख हे दुर्लभ होते ते इतरांना काय ब्रम्हादिक देवांना देखिल दुर्लभच होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग