वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

क्याला मज आयो वारिते

🙏 3. संत तुकाराम · ABH-079511 · अभंग क्र. ३८०५

3805.
क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतो सोकरा नंदाचा मी ॥१॥
बहु दिसी झाली यासी मज भेटी । आता वाटे तुटी न परावी ॥धृपद॥
कोवळे बोलतो मना आवरते । डोळियाचे पाते ढापवेना ॥२॥
आजि सकळांसी आले चोलुनिया । का गो पाठी वाया पुलविली ॥३॥
तुमचे ते काय खोळंबले काज । बल्या का गो मज कोंडा घरी ॥४॥
तुकयाचा धनी वैकुंठनायक । सरा काही एक बोलतो मी ॥५॥

अर्थ :
एक लहान बोबडी गवळण आपल्या आईला म्हणते की काय ग आई तू सारखे मला खेळू नको व घरात जा असे म्हणतेस नंदाचा मुलगा आणि आम्ही खेळत आहोत तरी आम्हाला खेळू दयावे. खूप दिवस झाले याची आणि माझी गाठभेट नव्हती आता गाठभेट झाली तर आमच्यामधे अंतर पडू नये असेच मला वाटते. तो कान्हा खूप कोवळा व सुंदर मनाला आवडेल असे शब्द बोलतो त्याला पाहाताना डोळयाचे पाते सुध्दा झाकावेसे वाटत नाही. आज मी सगळयांना चोरुन कृष्णाबरोबर खेळण्यास आले तर तू माझ्या पाठीमागे का व्यर्थ आली आहेस ? माझ्यावाचून तुमचे कोणते काम खोळंबले आहे तुम्ही सर्व शहाणे आहात तरी देखील मला घरामधे का कोंडून ठेवता ? तुकाराम महाराज म्हणतात, ती गवळण पुढे म्हणते की, मी तुकारामाचा स्वामी वैकुंठाचा नायक याच्याशी बोलत आहे तुम्ही सर्वजणी बाजूला व्हा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग