वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 213. कोडे ३८१३ ते ३८१६

आम्ही नवल देखिले भाई

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090468 · अभंग क्र. ३८१५

3815.
आम्ही नवल देखिले भाई । मुंगीनेहत्तीशी केली लढाई । उंटाचा कान धरूनि चिमाई । घरोघरी खातसें ॥१॥ सांगा आमुचे कोडे । लांडग्यासाठी शेळी रडे । कोल्हे हांसतसें बापुडे । उंदीररेडे खेळती ॥२॥ वरले गांवीचा एक हत्ती । नित्यखातो प्रजापती । सिंह तया येतो काकुळती । हंसरूसे कागाप्रती ॥३॥ एका जनार्दनाचे कोडे । उगवीतोचि जाणा वेडे । शहाणे त्यासी नुमगे गाढे । अर्थपहातां चुके लिगाड ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग