वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079604 · अभंग क्र. ३८२६

3826.
(बाळक्रीडा अभंग)
लीळाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥
मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनिया करी स्तनपान ॥धृपद॥
नभाचा ही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हाते त्यासि ॥२॥
हाते कुर्वाळुनी मुखी घाली घास । पुरे म्हणे तीस पोट धाले ॥३॥
पोट धाले मग देतसे ढेंकर । भक्तीचे ते फार तुळसीदळ ॥४॥
तुळसीदळ भावे सहित देवापाणी । फार ते त्याहुनि क्षीरसागरा ॥५॥
क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचे ते जळ गोड देवा ॥६॥
देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्याठायी ॥७॥
त्यांचा हा अंकित सर्व भावे हरी । तुका म्हणे करी सर्व काज ॥८॥

अर्थ :
स्वत: विविध प्रकारची लीला करणारा भगवान श्रीकृष्ण यशोदेच्या हाताने विविध प्रकारचे अलंकार व वस्त्रे नेसत होता व यशोदाही त्याला मांडीवर बसून घास भरवित असे. कृष्ण यशोदेच्या मांडीवर बसून स्तनपान करत असे त्यावेळी यशोदेला तो फुलासारखा हलका वाटत असे. नभाचाही साक्ष असलेला व पाताळाच्याही पलीकडे असलेल्या कृष्णाला यशोदा माता आपल्या हाताने कुरवाळत होती. यशोदा माता आपल्या हाताने कुरवाळून कृष्णाला घास भरवित असे त्यावेळी कृष्ण यशोदा माताला म्हणे, आता पुरे झाले माझे पोट भरले आहे. पोट भरल्यानंतर कृष्ण्‍ ढेकर देत असे अशा या कृष्णाला भक्तिपूर्वक तुळशीचे एक पत्र जरी वाहिले तरी त्याला ते पुष्कळ वाटत असे. तुळशीदळ आणि पाणी भक्तिभावपूर्वक देवाला वाहिले की, ते त्याला फार वाटत असे. एक वेळ क्षीरसागराचाही देवाला कंटाळा येईल परंतु भक्ताने अर्पण केलेले जल देवाला फार गोड वाटते. देवाला आपला भक्त जीवापेक्षाही जास्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग