वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(गौळणींची अवस्था)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079596 · अभंग क्र. ३७९७

3797.
(गौळणींची अवस्था)
कोठे मी तुझा धरू गेले संग । लावियेले जग माझ्या पाठी ॥१॥
सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावू चाळा खोटा येथे ॥धृपद॥
रूपाच्या लावण्ये नेली चित्तवृत्ती । न देखे भोवती मी ते माझी ॥२॥
तुकयाचा स्वामी माझे जीवींच बैसला । बोलींच अबोला करूनिया ॥३॥

अर्थ :
एक गौळण म्हणते, की कृष्णा तुझी सांगत करण्याची बुद्धी मला कोठुन झाली असे वाटते; कारण त्या मुळे सारे लोक (वेडी म्हणून) माझ्या पाठीसी लागले आहे. हे गोपाळा, माझ्यापसुन दूर सरक. खोते छंद आम्हाला लावू नकोस. तुझ्या रूपलावन्याने माझी चित्तवृत्ति हरपली आहे. पाती, पुत्र हे देहसंबंधी ही मी विसरून गेले. त्यांचे भान मला राहिले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बोलता बोलताच अबोल करून माझे स्वामी अभेदाने माझ्या प्राणांत जावून बसला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग