वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079503 · अभंग क्र. ३८२८

3828.
(बाळक्रीडा अभंग)
कुंभपाक लागे तयासि भोगणे । अवघाचि नेणे देव ऐसा ॥१॥
देव ऐसा ठावा नाही जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥
कळला हा देव तयासीच खरा । गाई वत्से घरा धाडी ब्रम्हा ॥३॥
ब्रम्हादिका ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥
जाणवेल देव गौळियांच्या भावे । तुका म्हणे व्हावे संचित हे ॥५॥

अर्थ :
सर्व जग देवाचेच स्वरुप आहे असे ज्याला समजत नाही त्याला कुंभीपाक नरकच भोगावा लागतो. ज्या लोकांना सर्वत्र देवच आहे हे समजत नाही त्यांना पुढे यमयातना करतो, त्यांना त्रास देतो ज्यावेळी ब्रम्हृदेवाला कृष्णाचा खरा महिमा कळाला त्यावेळी ब्रम्हृदेवाने चोरुन नेलेले गाई, गोपाळ, वत्स पुन्हा घरी पाठवून दिले. ब्रम्हादिक देवांना देखील हा देव अगोचर आहे तर मग सामान्य मनुष्याला देवाचा महिमा कसा जाणवेल ? तुकाराम महाराज म्हणतात, जर आपले पूर्वसंचित आणि भक्तिभाव गवळयांसारखा असेल त्या गोपाळांसारखा असेल तरच आपल्याला देवाचा महिमा जाणवेल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग