शिमगा ३८११
3811.
शिमगा ३८११
सत्व गांठी उमगा । तेणे सफळ होईलशिमगा । तुम्ही हेच गाणेगा । तुम्ही हंसु नका हसुनका ॥१॥ भुत सभेची कारटीं । विषय गोवऱ्याचोरटी । उतरा कुकर्माची रहाटी । तुम्ही हंसू नकाहंसू नका ॥२॥ जागो जागी थांबा । अवघ्यामिळोनी मारा बोंबा । नजळे एरंडाच्या कोंबा । तुम्हीहंसू नका हंसू नका ॥३॥ गांवचा पाटील कोळी । काळोबाची पिकली पोळी । तुमची पाजळूद्या होळी । तुम्ही हंसू नका हंसू नका॥४॥ओटींत घेऊनीगुलाल । सख्या मेहुणीसंगें भुलाल । तिचा नवरामोठा जलाल । तुम्ही हंसू नका हंसूनका ॥५॥ एकाजनार्दनी पोस्त । गाणे गाता हाल मस्त । नाही तरभडवे समस्त । तुम्ही हंसू नका हंसू नका ॥६॥
