बाजार ३७९६
3796.
बाजार ३७९६
संसारनगरीबाजार भरला भाई । कामक्रोध लोभ यांचे गि-हाईक पाही ॥१॥ यांत सुखनाही त्यांत सुख नाही । या हाटाचे सुख कोठेनाही ॥२॥ या हाटासीथोर मेले नारदशुक भीष्मउमगले ॥३॥ आणि संती बाजार पाहीला । व्यर्थजाणोनि निराश भाविला ॥४॥ या बाजारी सुखनाहीं भाई । माझे माझे म्हणोनि ओझे वाही ॥५॥ एका जनार्दनी बाजार लटिका । संतसंगावाचुनी नोहेसुटका ॥६॥
