थाक ३८३४
3834.
थाक ३८३४
थाक रे थाक तुज नाही रे उंचनाक । तुझा देह करीन पाक । आपुली जन्ममरणाचीगोष्टी झाक । सर सर मागे सर ॥१॥ तुझा मायबापठाऊक आहे मला । माझ्या दासीच्या दासीपासूनकी रे झाला । गुरुगम्ये खूण नाही कळलीतुला । कच्चे मडके घेऊन जा आपले घराला ॥२॥ पाठमोरा उभा का राहसी । सन्मुख पाहिले नाहींमसी । तरी उघड्या कर चारी वेशी । पळूनजाशी कोणत्या दारी रे ॥३॥ म्या थाककैकासी दिधला । चंद्र सूर्य उभा केला । इंद्र आहेयेसणीला । काय रे सांगू मुला तुजला । भ्रांतीपडळ झांकून का नाही गेला ॥४॥ माझ्यामुलाचे एक मूल जाण । तू ब्रह्मचारी होऊन । क्षणांत साठ पोरगे होऊन । एका कन्या दान रे ॥५॥ पाराशरासारखा ऋषेश्वर । दिवसाचे करून । अंधकार । रतवी धिवरे नदीतीर । आगस्तिलीलोपामुद्रा । हाही खेळ म्यांच केला ॥६॥ अवघेजाणून प्रपंच सार । त्याला माझा की आधार । जे । राहती निराकार । एका जनार्दनी तत्पर ॥७॥
