वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

तव तो हरी म्हणे निजा

🙏 3. संत तुकाराम · ABH-079409 · अभंग क्र. ३८०२

3802.
तव तो हरी म्हणे निजांगने वो । लाइ नीच के देसील दोहणे वो ।
मजपे दुजे आले ते देव जाणे वो । शब्द काय हे बोलसी ते उणे वो ॥१॥
पाहा मनी विचारुनी आधि वो । सांडूनि देई भ्रांति करी स्थिर बुद्धि वो ।
तंट केले हे माझे तुझे उपाधी वो । उघडी डोळे आझुनि तरी धरी शुद्धि वो ॥धृपद॥
कोठे तरी दुनियांत वर्तिले वो । स्त्रियांनी भ्रतारा दाना दिले वो ।
कैसा भला मी नव्हे ते सोसिले वो । रुससी तू उफराटे नवल झाले वो ॥२॥
काय सांग म्या दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्वे आणविले हनुमंतासि वो ।
कष्टी केले मज गरुडा भीमकीसि वो । तुकयाबंधु म्हणे खरे खोटे नव्हे यासि वो ॥३॥

अर्थ :
ज्यावेळी श्रीकृष्ण महाल मंदिरात येणार हे सत्यभामेला समजले त्यावेळी सत्यभामा ने श्रीकृष्णाच्या स्वागताची तयारी केली परंतु रात्र निघून गेली व सत्यभामेच्या अंतकरणात कामवासनेचा लहरी उत्पन्न होत होत्या पण श्रीकृष्ण काही लवकर आले नाही दिवस उजेडता श्रीकृष्ण आले त्यावेळेस सत्यभामा त्यांना टोमणे देऊ लागली त्यावेळी श्रीकृष्ण सत्यभामेला म्हणाले हे सखे तू मला असे टोमणे का देत आहेस, तूच माझी सखी आहेस हे सखे माझ्याकडे दुसरे कोणी आले असेल तर ते देवालाच माहीत तू मला असे उगाच उणे दुणे शब्द का बोलत आहेस. तू या गोष्टीचा स्वतःच्या मनाशीच विचार करून पहा आणि देह भ्रांती टाकून देऊन तुझी बुद्धी स्थिर कर. हे सखे तू उपाधीमुळे आजपर्यंत माझे तुझे असे करत आली आहेस परंतु आता तुझे विवेक रुपी डोळे उघड आणि आतातरी शुद्धीवर तू यावेस. तू आज पर्यंत कुठे असे ऐकले आहे की आपल्या पत्नीने आपल्या स्वतःच्या पत्नीचे कोणाला द

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग