आपुलेनि रंगे येत होत
149.
आपुलेनि रंगे येत होती ये साजणी ।
तव एके वनवासी आलिंगिले गे माये ॥
बोलेना बोलो देईना ।
तेथे पाहाणेंचि अवघे पारुषले गे माये ॥
आपुले केले काही न चले वो आता ॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला देखता ॥
अर्थ :
हे सखी मी माझ्या नादात वनातुन येत असताना एका वनवासीने मला येऊन आलिंगन दिले. तो स्वतः ही काही बोलत नव्हता व मला ही बोलु देत नव्हता. त्याच्याकडे पाहणे ही मला जमले नाही. अशा त्या माझ्या पित्याला रखुमाईच्या पती विठ्ठलाला पाहिले की आपले काही चालत नाही असा माझा अनुभव आहे असे माऊली सांगतात.
