देवा तुम्ही उदार असा
141.
देवा तुम्ही उदार असा त्रिभुवनी । तोडर चरणी ब्रीदावळी ॥१॥
ती आजि माझी पुरवावी आस । नका करू उदास जीवित्वासी ॥२॥
न करी न करी आन साधनासी । गाईन सर्व भावेसी नाम तुमचे ॥३॥
चोखा म्हणे देवा ही माझी वासना । पुरवा नारायणा कोड माझे ॥४॥
