वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

पदक विठ्‌ठलाचे गेले

🙏 16. संत जनाबाई · ABH-074056 · अभंग क्र. १४९

149.
पदक विठ्‌ठलाचे गेले । ब्राह्मण म्हणती जनीने नेले ॥1॥
अगे शिंपियाचे जनी । नेले पदक दे आणुनी ॥2॥
देवासमोर तुझे घर । तुझे येणे निरंतर ॥3॥
म्या नेले नाही जाण । सख्या विठोबाची आण ॥4॥
धोतर झाडूनि पाहती । पडले पदक घेऊनि जाती ॥5॥
जनी वरी आली चोरी । ब्राह्मण करिती मारा मारी ॥6॥
धाविन्नले चाळीस गडी । जनीवरी पडली उडी ॥7॥
दंडी लाविल्या काढण्या । विठो धावरे धावण्या ॥8॥
चंद्रभागे रोविला शूळ । जनाबाईस आले मूळ ॥9॥
हाती टाळी वाजविती । मुखी विठ्‌ठल बोलती ॥10॥
विलंब लागला ते वेळी । म्हणती जनिला द्यारे सुळी ॥11॥
ऐसा येळकोट केला । जनी म्हणे विठो मेला ॥12॥
तव सुळाचे झाले पाणी । धन्य म्हणे दासी जनी ॥13॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग