सैराटगोधनें चालती वन
142.
सैराटगोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ॥१॥
सांवळे चतुर्भुज मेघःश्याम वर्ण । गाईगोपाळां समवेदा खेळे मनमोहन ॥२॥
यमुनेचे पाबळीं मिळोनिया सकळीं । खेळे चेंडुफळी गाडियांसम ॥३॥
एका जनार्दनी मदनपुतळा । देखियेला डोळा नंदरायाचा ॥४॥
