वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

रामकृष्ण गोविंदाचे न

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075047 · अभंग क्र. १४६

146.
रामकृष्ण गोविंदाचे नामस्मरण वाचे ।
घडिये घडिये सांचे ध्यान श्रीविठ्ठलाचे ॥
एकनाम आठविता दूता पडियेली चिंता ।
नाम आनंदे गाता पाविजे सायुज्यता ॥
तिही लोकी नाम थोर वेदशास्त्राचे सार ।
सगुण निर्गुणाकार निज ब्रह्मा सार ॥
बापरखुमादेविवरू कृपाळू उदारू ।
नामस्मरणे पारू उतरी हा निर्धारू ॥

अर्थ :
रामकृष्ण या नामाचे स्मरण वाचेने करावे व सतत विठ्ठलाचे ध्यान करावे. एक नाम वाचेने घेतल्याने त्या अजामेळाला यमदूतांना सोडावे लागले होते. अशा नामस्मरणाने आपले कसे होणार याची चिंता यमाला लागून राहिले आहे. नाम आनंदाने गायले तर सायुज्जता मिळते. सगुण, निर्गुण, निजब्रह्म असलेले नाम हे थोर असून वेदशास्त्राचे सार आहे. माझे पिता आणि रखुमाईचे पती विठ्ठल कृपाळू व उदार असून ते त्यांच्या नामस्मरणाने भवसागर पार होतो अशी खूणगाठ बांध असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग