वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 5. भक्त वत्सलता

जनीने बोलिले तैसेच ल

🙏 16. संत जनाबाई · ABH-074109 · अभंग क्र. १४३

143.
जनीने बोलिले तैसेच लिहिले । साद्य परिसिले तुह्मी संती ॥1॥
अहो ज्ञानदेवा असावे तुह्मा ठावे । येणे काय लहाणीव आणिली आह्मां ॥2॥
माझी मज आण सांगते प्रमाण । सेविते चरण तुझे स्वामी ॥3॥
जनीचे हो बोल स्वानंदाचे डोल । स्वात्ममुखी बोल दुणावती ॥4॥
शुद्ध सत्त्व कागद नित्य करी शाई । अखंडित लिही जनीपाशी ॥5॥
हांसोनी ज्ञानदेवे पिटियेली टाळी । जयजयकार सकळी केला थोर ॥6॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग