धरोनिया आशा टाकिलासे
143.
धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥
कवणासी सांकडे सांगू पंढरीराया । कांहो न ये दया माझी तुम्हा ॥२॥
बाळकाचे परी लडिवाळपणे । तुमचे पासणे मी तो देवा ॥३॥
चोखा म्हणे मज तुम्ही मोकलिता । काय आमुची कथा आता चाले ॥४॥
