वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

श्यामाचि श्यामशेज वर

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090123 · अभंग क्र. १४३

143.
श्यामाचि श्यामशेज वरी । तेज विराजे सहजे केशिराज क्षीरार्णवी ॥१॥
शेषशयन अरुवारी गोविंद क्षीरसागरी । तो नंदयशोदेघरी क्रीडतुसे ॥२॥
अनंत नामी क्षीर क्षरलासे साचार । गोपिकासमोर हरीराजा ॥३॥
नाही योगिया दृष्टि मनोमयी करि सृष्टि । पाहाता ज्ञानदृष्टी विज्ञान हरि ॥४॥
शांति नेणे क्षमे पारु विश्रांतिसी अरुवारु । तो कैसा पा उदारु गोपाळांसी ॥५॥
विचाराचे देटुगे आकार निराकार सांगे । तो गोसावी निगे गोकुळी रया ॥६॥
निवृत्तीचे परब्रह्म नामकृष्ण विजय ब्रह्म । चिंतिता चिंताश्रम नासोनि जाय ॥७॥

अर्थ:
त्या श्याम रंग परमात्म्याच्या रंगामुळे आकाशच श्याम रंगात रंगुन त्याची शय्या झाले व त्या श्याम रंगामुळे क्षिरसागर ही अलौकिक निल तेजाने चमकत आहे. जो परमात्मा क्षिरसागरात शेषशय्येवर आहे तोच नंद यशोदेच्या घरात खेळत आहे. ज्याने क्षिरसागराची निर्मीती केली तोच परमात्मा गोपीकांसाठी हरिराज आहे. जे योगी मनाच्या दृष्टीने स्थुल जगताला पाहतात तेंव्हा ते जगत मिथ्या मायिक आहे हे त्यांना समजत नाही. व ज्ञानदृष्टी देऊन तोच हरि ते मायिक विज्ञात्वाला दुर करतो.जो परमात्मा शांती व क्षमेचे विश्रांतीस्थान आहे. किंवा ह्या दोन्ही त्याच्याजवळ वस्ती करतात.तो गोपाळांची कामे करत आहे. ज्याला विचारवे की तुझे मुळ रुप कोणते तर तो ठसठसशीत (देटुगे) पणे निराकार निर्गुण सांगतो तो गोसावी कृष्ण होऊन गोकुळात राहतो. निवृतिनाथ म्हणतात,त्याचे नुसते नाम घेतली की विजय होतो त्याच्या चिंतनाने चिंता दुर होते अ़सा ते चिंतामणी नाम आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग