भावयुक्त भजता हरी पा
140.
भावयुक्त भजता हरी पावे पूर्णता । तो गोकुळी खेळता देखो हरी ॥१॥
मुक्तीचे माजीवडे ब्रह्म चहूंकडे । गौळणी वाडेकोडे खेळविती ॥२॥
न संपडे ध्यानी मनी योगिया चिंतनी । तो गोकुळीचे लोणी हरी खाये ॥३॥
निवृत्तिजीवन गयनीनिरूपण । तो नारायण गोकुळी वसे ॥४॥
अर्थ:
पुर्ण समर्पण भावाने त्याचे नामस्मरण केले तर तर हरि पुर्णत्वाने प्राप्त होतो.तोच बाळकृष्ण बनुन गोकुळात खेळत आहे. तो मुक्तीदाता सर्व बाजुने जगात कोंदला आहे मात्र सगुण रुपातील त्याला, गवळणी कडेवर खेळवतात. जो परमात्मा योग्यांच्या ध्यानात सापडत नाही तोच गोकुळात लोणी चोरुन खातो.निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी त्याचे स्वरुप मला समजवल्यामुळे त्या गोकुळात राहणाऱ्या नारायण मी समजु शकलो.
