वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

न सुचे मज कांही शेवट

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075357 · अभंग क्र. १४९

149.
न सुचे मज कांही शेवट हा आला । आजिवरि झाला वारावार ॥१॥
आता अवसान कोणाचे चिंतन । नव्हे मज जाण मायामोहे ॥२॥
केले ते अवघे झाले फलकट । वाउगा बोभाट करोनी काई ॥३॥
वाया गा पसारा माझे आणि तुझे । गुंतलो वाउगे मृगजळा ॥४॥
चोखा म्हणे मज न कळे है कांही । उपायचि नाही दुजा आता ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग