वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ४, संत एकनाथ गौळणी

गोकुळी चोरी करितो चक

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073258 · अभंग क्र. १४८

148.
गोकुळी चोरी करितो चक्रपाणी । गौळणी येउनी सांगती गार्‍हाणी ।
येणे माझे भक्षिले दही दूध लोणी । पळोनिया येथे आला शारंगपाणी वो ॥१॥
आवरी आवरी यशोदे आपुला कान्हा । याच्या खोडी किती सांगु जाणा ।
याचे लाघव न कळे चतुरानना । यासी पाहता मन नुरे मीपणा वो ॥२॥
एके दिवशी मी आपुले मंदिरी । मंथन करिता देखिला पुतनारी ।
जवळी येवोनि रवीदंड धरी । म्हणे मी घुसळितो तु राहे क्षणभरी वो ॥३॥
परवा आमुचे घरासी आला । संगे घेउनी गोपाळांचा मेळा ।
नाचले ऐकत धरे पाहे अचला । धरू जाता तो पळोनिया गेला वो ॥४॥
ऐसे बहु लाघव केले येणे । किती सांगावे तुज गार्‍हाणे ।
एका जनार्दनी परब्रह्मा तान्हे । यासी ध्याता खुंटले येणे जाणे वो ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग