वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

सकळ धर्माचे कारण । न

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075058 · अभंग क्र. १४२

142.
सकळ धर्माचे कारण । नामस्मरण हरिकिर्तन ।
दया क्षमा समाधान । संतजन साधिती ॥
निजधर्म हा चोखडा । नाम उच्चारू घडघडा ।
भुक्तिमुक्तिचा संवगडा । हा भवसिंधु तारक ॥
लावण्य मान्यता विद्यावंत । सखे स्वजन पुत्र कलत्र ।
विषय भोग वयसा व्यर्थ । देहासहित मरणावरती ॥
जे जे देखणे सकळ । ते हे स्वप्नीचे मृगजळ ।
म्हणोनि चिंती चरणकमळ । रखुमादेविवर विठ्ठलाचे ॥

अर्थ :
धर्माच्या सर्व कारणांच्या पुर्ततेसाठी हरिकीर्तन दया क्षमा व समाधान आवश्यक असते व तेच संतजन साधत असतात. भवसिंधु तारक, भुक्ती व मुक्तीचा संवगडी असलेला निजधर्म हा घडघडा नाम उच्चारामुळे साध्य होतो. विद्वानातील अहंकार, शरिर सौंदर्य, सखे, स्वजन, मुले पत्नी हे विषयभोगची प्रतिके आहेत. व ते देहासहित मरणाच्या भोवऱ्यात टाकणारे आहे. जे जे जड सुंदर दिसते ते एक मृगजळासारखे भासमान आहे म्हणुन माझे पिता व रखुमाईचे पती यांचे चरणकमळांचे चिंतन कर असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग