हरिदासाचिये घरी । मज
141.
हरिदासाचिये घरी । मज उपजवा जन्मांतरी ॥१॥
म्हणसी काही मागा । हेचि देगा पांडुरंगा ॥२॥
संता लोटांगणी । जाता लाज नको मनी ॥३॥
तुका म्हणे अंगी । शक्ति देई नाचे रंगी ॥४॥