वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

जांताचि गोकुळा बाहेर

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089881 · अभंग क्र. १४१

141.
जांताचि गोकुळा बाहेरी ।
कृष्णपाउलांचिया हारी ।
उमटल्या देखोनि महीवरी ।
प्रेमा अंतरी न संटे ॥१॥
चरणमुद्रांकित चिन्हे ।
देखोनि घाली लोटांगणे ।
अंतर्निष्ठेंचे हे लेणे ।
लेउनी निमग्न ते ठायी ॥२॥
आनंदाश्रु गळती नेत्री ।
स्वेदरोमांच उठती गात्री ।
कंप स्फुंदने विकळ गात्री ।
सद्रदितु मुरकुंडे ॥३॥
सर्व साक्षी नारायण ।
जाणेनिया त्याचे चिन्ह ।
आला अति त्वरे धावोन ।
तया उमजवून आलिंगी ॥४॥
दोघा हो सरली भेटी ।
पडिली आनंदाची मिठी ।
मग अचळ पुसोनिया मुखवटी ।
परम कृपेने न्याहाळी ॥५॥
पुसे अंतरीचे गुज ।
तयापाशी अधोक्षज ।
येरे वंदूनिया चरणरज ।
मंजुळा उत्तरी बोलतु ॥६॥
निळा म्हणे स्तवन करी ।
मग नि:स्तब्ध्‍ा निमिषवरी ।
अवलोकुनिया चरणावरी ।
ठेवी मस्त्क क्षणाक्षणा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग