आगम निगमा बोलता वैखर
147.
आगम निगमा बोलता वैखरी । तो यशोदेच्या करी धरूनी चाले ॥१॥
न संपडे शिवा बैंसताची ध्यानी । जालिया उन्मनी दृश्य नव्हे ॥२॥
कमळासनी ब्रह्मा ध्यानस्थ बैसला । पाहता पाहता मुळा न संपडे ॥३॥
निवृत्ति गयनी सांगतुसे खुणा । तो देवकीचा तान्हा बाळ झाला ॥४॥
अर्थ:
ज्याचे वर्णन करणे आगमा निगमाला जमले नाही वेद व श्रुती मौनावल्या तो परमात्मा यशोदेचे बोट धरुन चालतो. महादेव शिव ध्यान लाऊन बसतात तरी त्यांच्ये पुर्ण स्वरुप ते पाहु शकत नाहीत. उन्मनी अवस्थेत ही तो त्यांना दिसत नाही. ब्रह्मदेव कमळाच्या आसनावर ध्यानस्त बसुन ह्याला पाहायला गेला तरी ही मुळ स्वरुपात पाहु शकला नाही. निवृतिनाथ म्हणतात, तो परमात्मा देवकीचे तान्हे बाळ झाला ही श्री गुरु गहिनीनाथानी मला त्याची खुण ही सांगितली
