नको मज मान अथवा अपमा
147.
नको मज मान अथवा अपमान । दोहींचे कारण मज नाही ॥१॥
सुख अथवा दु:ख संचिताचा ठेवा । संकल्पाचा ठेवा जैसा तैसा ॥२॥
जन्म मरण है तो बांधिले पदरी । वाया हाव भरी येणे संगे ॥३॥
चोखा म्हणे ऐसा नेमियेला नेम । तेंचि है वर्म भोगू आता ॥४॥
