त्रेतायुगी ख्याती कर
146.
त्रेतायुगी ख्याती करोनिया थोर । वधिले असूर रावणादी ॥१॥
कोण्या हेतुस्तव पुन्हा आगमन । सांगा कृपा करून दासालागी ॥२॥
ऐकोनिया वचन बोले सर्वेश्वर । द्बापारी अवतार आठवा हा ॥३॥
तुझे हे भेटीस्त व रूप हेम धरिले । दावा ते वहिले कपी ह्मणे ॥४॥
कृष्णलीला पाहू हेत आहे चित्ता । दावी सीताकांता दीनालागी ॥५॥
चतुर्भुज रूप दाविले प्रगट । शिरी मोरमुगुट शोभतसे ॥६॥
गुंजाहार गळ वैजयंती माळा । कांसेसी पिंवळा पीतांबर ॥७॥
नवलक्ष गाई गोपही तितुके । खेळती कौतुके करोनिया ॥८॥
नामा म्हणे तेव्हा स्तुति ते करीत । न कळे तुझा अंत ब्रह्मादिका ॥९॥
