ऐसे बैसला रथावरी ।
147.
ऐसे बैसला रथावरी ।
भोवते गोवळ चालती फेरी ।
हे देखोनिया नगर नारी ।
अत्यंत प्राण विकल त्यांचे ॥१॥
आता कृष्णा येसील केव्हा ।
भेटसील प्राण शितळ तेव्हा ।
आठव आमुचाहि धरावा ।
तेथे पाहुणेरी गुंतता ॥२॥
ऐकोनिया त्यांची वचने ।
संतोशीजे उभयता मने ।
मग त्या देउनी आश्वास ने ।
आज्ञा करिती ते अक्रूरा ॥३॥
आता रथ चालवी वेगी ।
विलंब नव्हे ऐसा मार्गी ।
माता पिता गौळणी लागी ।
रहाविले अत्यादरे ॥४॥
मार्गी चालता परम संतोषी ।
करिती संवाद येरेयेरांसी ।
म्हणती धरिलिया अवतारासी ।
आजि झाले सार्थक ॥५॥
होता मामासवे भेटी ।
पडेल जिवे जीवा गाठी ।
परमानंद होईल सृष्टी ।
दृष्ट कंटक निमालिया ॥६॥
निळा म्हणे ऐसिया लाभा ।
उभयतांहि अंगी शौर्यशोभा ।
दाटली तेणे ऐश्रवर्य शोभा ।
जातासे हे अक्रूरा जाणवले ॥७॥
