हरि आला रे हरि आला र
145.
हरि आला रे हरि आला रे । संतसंगे ब्रह्मांनंदु जाल रे ॥
हरि येथे रे हरि तेथे रे । हरिवांचूनि न दिसे रिते रे ॥
हरि पाही रे हरि ध्यांई रे । हरिवांचूनि दुजे नाही ॥
हरि वाचे रे हरि नाचे रे ॥ हरि पाहात आनंदु साचे रे ॥
हरि आदी रे हरि अंती रे । हरि व्यापकु सर्वांभूती रे ।
हरि जाणारे हरि वाना रे । बापरखुमादेविवरू राणा रे ॥
अर्थ :
तो हरि अंतरबाह्य स्वरुपात आमच्यात आला. त्यामुळे संतसंग मिळाला व ब्रह्मानंद झाला. हा हरि सर्वत्र आहे जिकडे तिकडे तोच आहे त्याच्याहुन रिते काही नाही. त्या हरिला तुम्ही पहा व त्याचे ध्यान करा त्यावाचुन दुसरे जगतात काही नाही. हरिनाम वाचेने घ्या नाचत घ्या जो आनंद होईल तोच हरि आहे. तोच हरि आदि आहे व अंती ही आहे तोच सर्वत्र सर्वाभूती व्यापक आहे. त्याच हरिला जाणा त्याचेच वर्णन करा तो हरि जे माझे पिता व रखुमाईचे पती आहेत तेच ह्या जगताचे राजे आहेत असे माऊली सांगतात.
