खांद्यावरी कांबळी हा
143.
खांद्यावरी कांबळी हातामधी काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥
राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥
एक एक गौळणी एक एक गोपाळा । हाती धरुनि नाचती रासमंडळा ॥३॥
एका जनार्दनी रासमंडळ रचिले । जिकडे पाहे तिकडे अवघे ब्रह्म कोंदले ॥४॥
