वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ४, संत एकनाथ गौळणी

गौळणी सांगती गार्‍हा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073271 · अभंग क्र. १४५

145.
गौळणी सांगती गार्‍हाणी । रात्री आला चक्रपणी ।
खाऊनी दही दूध तूप लोणी । फोडिली अवघी विरजणी ।
हा गे बाई कोणासी आवरेना ॥१॥
यशोदे बाळ तुझा तान्हा । कोठवर सोसू धिंगाणा ॥धृ॥
दुसरी आली धांवत । याने बाई काय केली मात ।
मुखाशी मुखचुंबन देत । गळ्यामधी हात घालीत ।
धरु जाता सांपडेना ॥२॥
तिसरी आली धांऊनि । म्हणे गे बाई काय केली करणी ।
पतीची दाढ़ी माझी वेणी । दोहीसी गांठ देऊनी ।
गांठ बाई कोणासी सुटेना ॥३॥
मिळोनि अवघ्या गौळणी । येती नंदाच्या अंगणी ।
जातो आम्ही गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना घेऊनी ।
हे बाई आम्हांसी पहावेना ॥४॥
ऐशी ऐकता गार्‍हाणी । यशोदानयनी आले पाणी ।
कृष्णा खोडी दे टाकुनी । एका जनार्दनी चरणी ।
प्रेम तया आवरेना ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग