आठऊनिया श्रीकृष्णचरण
140.
आठऊनिया श्रीकृष्णचरण ।
अक्ररे रायाते पुसोन ।
चालिला रथावरी बैसोन ।
मार्गी हरिगुण आठवितु ॥१॥
गोकुळा पाठविला अक्रूर ।
परि कंसामनी दचक थोर ।
तेणे पाचारुनिया धनुर्धर ।
चौकिये बाहेर बसविले ॥२॥
म्हणे येता देखोनिया कृष्णासी ।
युध्द करावे अति आवेशी
द उतरुनी त्याचिया मस्तकासी ।
मजपाशी आणावे ॥३॥
रजका सांगे निजमुखे ।
कृष्णा येताचि धोपटी सुखे ।
तुझिये पाठिसि हे आसिके ।
सावध ठेविले धनुर्धर ॥४॥
मग बोलाऊनिया मल्लजेठी ।
बैसविले ते दारवंटी ।
मातला हस्ती त्याचिये पुष्टी ।
कुळवई ठेवियेला ॥५॥
तया भोवते आणिक कुंजर ।
उभे केले ते दळभार ।
तव इकडे जाऊनिया अक्रूर ।
भेटला नंद यशोदेसी ॥६॥
निळा म्हणे पुसे कृष्णा ।
तव ते म्हणती गेला राना ।
मग रथ तेथेचि ठेऊनी जाणा ।
चालिला दर्शना कृष्णाचिया ॥७॥
