नका होऊ खेदक्षीण ।
145.
नका होऊ खेदक्षीण ।
घ्या भाष माझे बंधन ।
तुम्हा वाचूनिया मजही कोण ।
आहे ते आप्त इहलोकी ॥१॥
जैसा तुमचा मजवरी भाव ।
माझीही तैसाची तुम्हावरी जीव ।
नाही येथे संदेहा ॥ ठाव ।
चित्ताचित्त साक्ष असे ॥२॥
तुम्ही निरंतर मातेचि ध्याता ।
मीही न विसंबे तुम्हीची देखता ।
ऐसे परस्परे बोलता ।
लोटती उभयता नेत्री पूर ॥३॥
वियोग न साहवे कृष्णासी ।
त्याही होती कासावीसी ।
परी धैर्याचिया अती आवेशी ।
पुढील साधिती कार्यार्थू ॥४॥
भक्तकृपाळू श्रीहरी ।
अवघा प्रेमा भक्ताचि वरी ।
त्याचि कार्या अवतार धरी ।
न विसंबे क्षणभरी नव्हे परता ॥५॥
अनावरा आवरिले जिही ।
जिव प्राण ठेवूनि पांई ।
हाही तयाते निज ह्रदयी ।
सर्वकाळ आठवितु ॥६॥
निळा म्हणे संबोखिल्या ।
ऐसिया उत्तरी स्थिराविल्या ।
मनोरथ करुनिया ठेविल्या ।
आपुलीये चिंतनी सादर ॥७॥
