आम्ही लेकुरे लळेवाडे
143.
आम्ही लेकुरे लळेवाडे ।
तुमची तैसी त्याहि पुढे ।
क्रीडा करुनी वाडे कोडे ।
येऊ भेटोनिया वोरसे ॥१॥
नाही तया पोटी मैल ।
अत्यादरे धाडिले असे मूळ ।
अक्रूर सांगताहे केवळ ।
भेटी आमुची इच्छितो ॥२॥
तुम्ही न धरावा संशय ।
तेथे आम्हा नाही भय ।
मामाभेटी जाता काय ।
आमुची इच्छितो ॥२॥
तुम्ही न धरावा संशय ।
तेथे आम्हा नाही भय ।
मामा भेटी जाता काय ।
उव्देग घडती भाचिया ॥३॥
ते म्हणती रे नव्हे कृष्णा ।
तुम्ही त्याचा भावार्थ नेणा ।
कालिची पहा पा पूतना ।
आली होती घातावया ॥४॥
केवढी दाऊनिया माया ।
बसली तुंते स्तन धावया ।
कृष्णा म्हणे मी धालो तिचिया ।
स्तनपानेंची आजिवरी ॥५॥
तिणे वेचोनिया कायाशक्ती ।
आम्हासि तोषविले प्राणांती ।
उपकार तिचेहि श्रीपती ।
म्हणे मुखे मी काय वानू ॥६॥
निळा म्हणे बोलोनि ऐसे ।
न रहातीचि चालिले उददेशे ।
गोपिका गौळणीही ऐकोनि ऐसे ।
आल्या धावत हरिपाशी ॥७॥
