वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

धांव घाली विठु आता च

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075264 · अभंग क्र. १४५

145.
धांव घाली विठु आता चालु नको मंद ।
मज मारिती बडवे कांहीतरी अपराध ॥१॥
विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला ।
शिव्या देऊनी मारा म्हणती देव का बाटला ॥२॥
तुमचे दारीचा कुतरा नका मोकलू दातारा ।
अहो चक्रपाणी आहा जीमेदारा ॥३॥
कर जोडोनी चोखा विनवितो देवा ।
बोलिलो उत्तर याचा राग नसावा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग