वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

चालता पाऊल पंढरीच्या

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076053 · अभंग क्र. १४१

141.
चालता पाऊल पंढरीच्या वाटे ।
ब्रह्मसुख भेटे रोकडेची ॥१॥
दिंडी ध्वजा भार चालती अपार ।
मृदंग-गंभीर-स्वरश्रुति ॥२॥
हमामा हुंबली घालिती परवडी ।
होउनी उघडी विष्णुदास ॥३॥
बहेणि म्हणे ऐसा आनंद वाटेचा ।
कोण तो दैवाचा देखे डोळा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग