वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

सकळ नेणोनिया आन । एक

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075057 · अभंग क्र. १४८

148.
सकळ नेणोनिया आन । एक विठ्ठलुची जाण ॥
पुढत पुढती मन । एक विठ्ठलुचि जाण ॥
हेची गुरुगम्याची खूण । एक विठ्ठलुचि जाण ॥
बुझसी तरी बुझ निर्वाण । एक विठ्ठलुची जाण ॥
हेचि भक्ति हेचि ज्ञान । एक विठ्ठलुचि जाण ॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलचि आण । एक विठ्ठलुचि जाण ॥

अर्थ :
इतर काही जाणण्या पेक्षा त्या एका विठ्ठलाला जाण. हे मना पुन्हा पुन्हा सांगतो त्या विठ्ठलाला जाण. गुरुकडुन जाणणे म्हणजे त्या विठ्ठलाला जाणणे आहे. निर्वाण जाणायचे असेल तरी तु विठ्ठलाला जाण. भक्ती व ज्ञानासाठी ही विठ्ठलालाच जाण. माझे पती व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची शपथ घेऊन सांगतो फक्त त्या विठ्ठलालाच जाण असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग