वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 70. असुरासुर वध

असुरासुर वध.

🙏 4. संत नामदेव · ABH-083064 · अभंग क्र. १४३

143.
असुरासुर वध.

अहर्निशी कंस बसे चिंताक्रांत । विचार पुसत प्रधा-नासी ॥१॥
प्रतिज्ञा करूनि शत्रुवधा जाती । ते मागे न येती पर-तोनी ॥२॥
आता पुरुषार्थी कोण पाठवावा । तो मज सांगावा निव-डोनि ॥३॥
सांगती प्रधान धाडा असुरासुर । तंव तो असूर उभा राहे ॥४॥
म्हणे मत्यु नसे मज कोणा हाती । द्वापारी मारुती गुप्त झाला ॥५॥
ऐकोनिया ऐसे आनंद मानसी । गौरविले त्यासी नानापरी ॥६॥
नामा म्हणे काळे बोलविले त्यासी । सत्वर वनासी येता झाला ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग