वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 15. वनक्रीडा - अभंग १३९ ते १४७

उठोनि प्रातःकाळी म्ह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084582 · अभंग क्र. १४७

147.
उठोनि प्रातःकाळी म्हणे यशोदा मुरारी । गोपाळ वाट पाहती उभे तुझ्या द्वारी । शिदोरी घेउनि वेगी जाय रानीं ॥१॥
यमुनेचे तीरीं खेळ खेळतो कान्हा । नानापरी क्रीडा करी यादवांचा राणा ॥धृ.॥
मागे पुढे गोपाळ मध्ये चाले हरी । सांवळा सुकुमार वाजवीं मुरलीम अधरीं । पुच्छे वर करुनी गाई नाचती नाना ॥२॥
मुरलीचा नाद समाय त्रिभुवनी । किती एक नादें भुलल्या गौळणी । देह गेह सांडोनि चालताती वनी ॥३॥
खग मृग गायी व्याघ्र नसे दुजा भाव । सकळीं उच्चारण एक कॄष्ण नांव । काया वाचा मने शरण एका जनार्दनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग