वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

गगन घांस घोंटी सर्व

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090091 · अभंग क्र. १४६

146.
गगन घांस घोंटी सर्व ब्रम्हांडे पोटी । निमुनिया शेवटी निरलंबी ॥१॥
ते ब्रह्म सांवाळे माजि लाडेंकोडे । यशोदेमायेपुढे खेळतसे ॥२॥
ब्रम्हांडाच्या कोटी तरंगता उठी । आप आपासाठी होत जात ॥३॥
निवृत्तिचे ध्यान यशोदेचे धन । वासुदेवखुण आम्हामाजी ॥४॥

अर्थ:
सर्व ब्रह्मांडासह गगनाचा एकच घास घेऊन ते पोटात साठवुन ते परब्रह्म एकटेच उरते. ते परब्रह्म सावळे रुप धरुन यशोदेच्या मागेपुढे मोठ्या लाडाकोडाने खेळत आहे. जशा समुद्रात लाटा येतात व लय पावतात तशी अनेक ब्रह्मांडे ह्याच्या मध्ये उत्पन्न व लय पावतात. निवृतिनाथ म्हणतात, यशोदेचे धन असणार माझी खुण असणारा वासुदेवांचे मी सतत ध्यान करतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग