वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

माझ्या कान्ह्याचे तु

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075028 · अभंग क्र. १४३

143.
माझ्या कान्ह्याचे तुम्ही नांव भरी घ्या वो ।
हृदयी धरोनी यासी खेळावया न्या वो ॥
भक्तांकारणे येणे घेतलीसे आळी ।
दहा गर्भवास सोसी वनमाळी ॥
कल्पनेविरहित भलतया मागे ।
अभिमान सोडूनी दीनापाठी लागे ॥
शोषिली पूतना येणे मोहिले लेकरू ।
आळी न संडी बाप रखुमादेविवरू ॥

अर्थ :
माझ्या कान्हाचे नांव तुम्ही प्रेमाने घ्या व हृदयाशी कवटाळुन तुम्ही ह्याला खेळावयास घेऊन जा. हा भक्तासाठी मोहित होतो व त्याच्या साठी दहा गर्भवासाचे दुःख ही निमुट भोगतो. त्याला ह्याची आजिबात कल्पना नाही व तो कोणत्याही भक्तासाठी हेच करतो. स्वतःला आभिमान येऊ न देता कोणत्याही दीन भक्तामागे धावतो. त्या पुतनेने मायेने त्याला मोहित करण्याचा प्रयत्न केला तर ह्यांने तिलाच शोषुन घेतले. असे माझे पिता व रखुमाईचे पती भक्तांचा छंद मात्र टाकुन देत नाही. असे माऊली सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग