रसने वो रसु मातृके व
141.
रसने वो रसु मातृके वो माये ॥
रमणि ये माये रमणिये ।
रामनामामृत रस पी जिव्हे ॥
निवृत्तिदासा प्रिय ।
माय रमणिये माय रमणिये ॥
अर्थ :
हे जिव्हे तु सर्व रसांची मातृका देवता आहेस. तुझ्या अंगभूत रमणियात्वाने तु रमवणारी आहेस. त्यामुळे तो रामनामरस पिऊन घे. व त्यामुळे तु रमणिय झाली असल्यामुळे तु निवृत्तिनाथांना प्रिय आहेस. असे माऊली सांगतात
